महाराष्ट्र पुन्हा धोक्यात! ‘या ‘ठिकाणी वादळी पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

नमस्कार मित्रांनो भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि सोलापूरसह विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह 4-10 मिमी पावसाची नोंद होऊ शकते.मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्येही हवामान ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

 

हे सुद्धा वाचा:- तुमची मुलगी लखपती होणार मिळणार एक लाख रुपये अशा प्रकारे करा अर्ज

कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत दुपारनंतर ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे.राज्यात कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवामानात बदल होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.तापमानाचा विचार करता, विदर्भात कमाल तापमान 43-44 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर कोकणात आर्द्रतेमुळे उकाडा जाणवेल. पुण्यात तापमान 32-35 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा:- तुमची मुलगी लखपती होणार मिळणार एक लाख रुपये अशा प्रकारे करा अर्ज

 

Leave a Comment