महावितरण ने घेतला मोठा निर्णय.! नागरिकांसाठी मोठी खुशखबर आता वीज बिल येणार खूपच कमी

नमस्कार मंडळी महावितरणने येत्या पाच वर्षांसाठी वीज दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने प्रथमच वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला असून, या कपातीचा लाभ राज्यातील 2 कोटी वीज ग्राहकांना होईल.

 

प्रस्तावानुसार, 2025-26 ते 2029-30 या कालावधीत वीज दर 12% ते 23% कपात होणार आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.प्रामुख्याने 2025-26 मध्ये जे घरगुती वीज ग्राहक 100 यूनिटपेक्षा कमी वीज वापरतात, त्यांना 15% कपात होईल.

 

हे सुद्धा वाचा:- सरकार देणार नागरिकांना मोफत वीज आणि 78 हजार रुपये असा करा अर्ज

यामध्ये पुढील काही वर्षांमध्ये दरात अधिक कपात होईल. 2029-30 पर्यंत, या ग्राहकांना प्रति यूनिट वीज 2.20 रुपयांवर मिळेल. सध्या त्यांना एक यूनिट वीज 5.14 रुपयांना मिळते. दरम्यान, 101-300 यूनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी सध्याचा दर 11.06 रुपये प्रति यूनिट आहे. दर कपातीच्या प्रस्तावानंतर, 2030 मध्ये एक यूनिट वीज 9.30 रुपयांना उपलब्ध होईल. 301-500 यूनिट वीज वापरणाऱ्यांसाठी दर 15.60 रुपयांवरून 2029-30 मध्ये 15.29 रुपये प्रति यूनिट होईल. 500 यूनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही दर कमी होईल, जो सध्या 17.76 रुपये प्रति यूनिट आहे आणि 2029-30 मध्ये 17.24 रुपये प्रति यूनिट होईल.औद्योगिक ग्राहकांसाठी देखील दिलासा दिला गेला आहे. औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलात तीन महिन्यांत 3% कपात होईल आणि पाच वर्षांत 11% कपात अपेक्षित आहे.

हे सुद्धा वाचा:- सरकार देणार नागरिकांना मोफत वीज आणि 78 हजार रुपये असा करा अर्ज

 

यामुळे उद्योगांना वीज दरात दिलासा मिळणार आहे. पण इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी वीज दरात (Electricity Rate) वाढ होणार आहे. सध्या 7.30 रुपये प्रति यूनिट असलेला दर 35% वाढवून 9.86 रुपये प्रति यूनिट होईल.

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, हा निर्णय नवे ऊर्जा प्रकल्प सुरू होण्यासाठी आणि कृषी पंपांसाठी सौर ऊर्जा वापरण्यामुळे घेतला गेला आहे. त्यांनी 2030 पर्यंत महाराष्ट्रातील वीजनिर्मिती क्षमता 81,000 मेगावॅटपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचेही म्हटले. नवे वीज दर 1 एप्रिल 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी फीडर प्रकल्प 2.0 मध्ये येत्या दोन वर्षात 16,000 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रयत्न केला जाईल, यामुळे घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना फायदा होईल, असे विश्वास पाठक यांनी सांगितले.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा