शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यात विहीर अनुदानाचे पैसे जमा होणार लगेच यादीत नाव बघा

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जात असून यातून पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते.अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे.

 

हे सुद्धा वाचा:- घर बंधाऱ्यांसाठी खुशखबर सरकार देणार आता मोफत वाळू असा करा अर्ज

प्रत्यक्षात ही योजना जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे राबवली जाते. लाभार्थीसाठी अनुदान समाज कल्याण विभागातर्फे दिले जाते. योजनेतून बऱ्याच विहिरी खोदल्या जात असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले.पावसामुळे चिखल आणि पाण्यामुळे विहिरीचे काम करता येत नाही. यासाठी विहिरींची कामे उन्हाळ्यातच केली जातात.शेतकऱ्याला उन्हाळ्यात इतर शेतीची कामे कमी असतात. अन्य कामाच्या व्यापातून वेळ मिळतो.योजनेतील पात्र लाभार्थ्याला नवीन विहिरीसाठी अडीच लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार, इनवेल बोरिंगसाठी २० हजार रुपये, कृषिपंपासाठी २० हजार, वीज जोडणीसाठी दहा हजार रुपये, शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख, ठिबक सिंचनासाठी ५० हजार,

हे सुद्धा वाचा:- घर बंधाऱ्यांसाठी खुशखबर सरकार देणार आता मोफत वाळू असा करा अर्ज

 

 

तुषार सिंचनासाठी २५ हजार रुपये अनुदान मिळतेशेतकरी नवबौद्ध, अनुसूचित जातीमधील असावा, सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला असावा, नवीन विहिरीसाठी कमीत कमी एक एकर जमीन असावी, शेतकऱ्याच्या नावे सात बारा, आठ अ असावा, विहिरीशिवाय इतर लाभ घेण्यासाठी कमीत कमी २० गुंठे जमीन असावी, लाभार्थीचे बँक पासबुक झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आतील असणे गरजेचे आहे.

Leave a Comment