विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! आता विद्यार्थ्यांना एसटी पासचे टेन्शन राहणार नाही

नमस्कार मित्रांनो आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी बसचा पास घेण्यासाठी एसटी आगारात रांगेत उभे राहावे लागणार नाही. कारण परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.आता विद्यार्थ्यांना त्यांचा एसटी पास थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्येच दिला जाणार आहे.

 

हे सुद्धा वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होणार येथे बघा तुमच्या खात्यात होणार का 

यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्यांना पास मिळवणे अधिक सोपे होणार आहे.येत्या नवीन शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र १६ जूनपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत ये-जा करण्यासाठी शासनाने एसटी प्रवासात ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. विद्यार्थ्यांना मासिक पास काढण्यासाठी केवळ ३३.३३% रक्कम भरावी लागते. शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. पण आतापर्यंत विद्यार्थ्यांना या पाससाठी एसटीच्या पास केंद्रांवर लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या किंवा शाळांनी गट करून आगारात जाऊन पास घ्यावे लागत होते

हे सुद्धा वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होणार येथे बघा तुमच्या खात्यात होणार का 

 

. मात्र आता त्रासातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार, एसटीचे कर्मचारी थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे पास देतील. यामुळे विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.संदर्भात १६ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र पाठवून नवीन वर्षातील विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरातील शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Leave a Comment