शेतकऱ्यांसाठी खुशखबर सौर कृषी योजनेत बदल या शेतकऱ्यांचा होणार आता फायदा March 26, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सौर कृषी पंप योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे.पाण्याची पातळी खालावलेल्या भागांमध्ये 10 एचपी क्षमतेचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी विधानसभेत जाहीर केले.” येथे क्लिक करून बघा ऑनलाइन अर्ज कसा करायचा. या वर्षीच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 10 लाख पंप बसविण्याचा मानस आहे. मात्र, काही भागांमध्ये पाणीपातळी खालावल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी 7.5 एचपी व 10 एचपी पंप बसवण्यास परवानगी दिली जाईल. तथापि, 7.5 एचपीपर्यंतच अनुदान मिळेल, त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठी अनुदान दिले जाणार नाही,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेशेतकऱ्यांना सिंचनासाठी किफायतशीर आणि टिकाऊ ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” राबवली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप दिले जात असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे येथे क्लिक करून बघा ऑनलाइन अर्ज कसा करायचा.