आता घरबसल्या 5 मिनिटात सातबाऱ्यावर विहीर- बोअरवेल नोंदणी करा, पहा शासनाची नवीन ऑनलाईन सुविधा June 9, 2025 by Liveyojana Satabara Utara Update 2025नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे शेतीसंबंधी कामकाज अधिक सोपं आणि जलद करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर असलेल्या विहीर, बोअरवेल आणि झाडांची नोंदणी केवळ एका स्मार्टफोनच्या सहाय्याने घरबसल्या करता येणार आहे येथे क्लिक करून बघा नोंदणी कशी करायची ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन असून यामुळे पारंपरिक पद्धतींच्या कागदपत्रांच्या अडचणी, तलाठी कार्यालयात होणाऱ्या वेळखाऊ भेटी आणि अवघड प्रक्रियांचा त्रास टळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि मेहनतीची मोठी बचत होईल.पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील विहीर किंवा बोअरवेलची नोंदणी करण्यासाठी अनेक वेळा तलाठी कार्यालयात जावे लागायचे, तिथे नोंदणीसाठी विविध प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागायची, तसेच फॉर्म भरणे आणि विविध तपासण्या करणे खूप वेळखाऊ आणि त्रासदायक असायचे. पण आता शासनाने ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात आणली असून “ई-पीक पाहणी DCS 2.0” या स्मार्ट ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सहज, जलद आणि सुरक्षित नोंदणी करता येते. येथे क्लिक करून बघा नोंदणी कशी करायची