RBI कडून खुशखबर! होम लोन स्वस्त होणार, रेपो रेटमध्ये पुन्हा कपात येथे जाणून घ्या नवीन रेपो रेट June 6, 2025 by Liveyojana RBI Repo Rates Home Loanनमस्कार मित्रांनो रीझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये (RBI Repo Rate) कपात केली आहे. सलग तिसऱ्यांदा ही कपात करण्यात आली आहे. ५० बेसिस पॉइंट्सने ही कपात केली आहे.यामुळे सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. हे सुध्दा वाचा:- आधार कार्ड करता येणार आता मोफत अपडेट्स येथे क्लिक करून बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली आहे. पतधोरण बैठकीत रेपो रेटबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधीही दोनदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये ५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. याआधी रेपो रेट ६ टक्के होता. आता ५० बेसिस पॉइंट्सने कपात केल्यानंतर रेपो रेट ५.५ टक्के झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये कपात करत आहे. पतधोरण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हे सुध्दा वाचा:- आधार कार्ड करता येणार आता मोफत अपडेट्स येथे क्लिक करून बघा रिझर्व्ह बँकेने याआधी पतधोरण बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. आता ५० बेसिस पॉइंट्सने ही कपात केली आहे.जर तुम्ही २० लाखांचे लोन घेतले असेल तर त्याच्या व्याजदरात कपात होणार आहे. जर तुम्ही हे लोन २० वर्षांसाठी ९ टक्के व्याजाने घेतले असेल तर सध्या त्याचा हप्ता १७,९९५ रुपये असेल. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर हा हप्ता १७,३५६ रुपये होईल.