कर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर.! आरबीआय ने केले बँकेचे कर्ज स्वस्त इथे बघा बँकेची यादी

नमस्कार मित्रांनो आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी गृहकर्जाचे व्याज कमी करण्यास सुरुवात केली आहे. आता देशातील ६ मोठ्या बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे

 

.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्स म्हणजेच ०.२५% कपात केली. त्यामुळे तो ६.२५ टक्क्यांवर आला

 

इथे क्लिक करून बघा बँकेची लिस्ट

 

. गेल्या दोन वर्षांत हा दर स्थिर होता. आता त्यात कपात करण्यात आली आहे.तेव्हापासून बँका गृहकर्जाचे दर कमी करतील, अशी अपेक्षा बहुतांश गृहकर्ज खरेदीदारांना होती. आरबीआयच्या या निर्णयानंतर देशातील ६ बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा सह अनेक बँकांनी आपल्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये ०.२५% कपात केली आहे.रेपो लिंक्ड लेंडिंग रेट म्हणजे बँका ज्या दरानं ग्राहकांना कर्ज देतात. हा दर थेट आरबीआयच्या रेपो दराशी निगडित आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये आरबीआयनं एक परिपत्रक जारी करून बँकांना त्यांचे रिटेल लोन बाह्य बेंचमार्क दराशी (E-BLR) जोडण्याचे निर्देश दिले होते. यामुळे बहुतांश बँकांसाठी रेपो दर हा मुख्य बेंचमार्क बनला आहे. आरबीआयच्या रेपो दरातील बदलानुसार आरएलएलआरशी जोडलेल्या गृहकर्जाची निवड करणाऱ्या ग्राहकांच्या व्याजदरात चढ-उतार किंवा वाढ होत असते. बहुतेक ग्राहक फ्लोटिंग रेट होम लोन घेतात, जे आरएलएलआरशी जोडलेले असतात. आता ग्राहकांना एकतर आपला ईएमआय कमी करण्याचा किंवा कर्जाचा कालावधी कमी करण्याचा पर्याय आहे.

इथे क्लिक करून बघा बँकेची लिस्ट

Leave a Comment