नमस्कार मंडळी तुम्हीही बँकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूक आणि प्रमोशनल कॉल्समुळे वैतागला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आजकाल फ्रॉड कॉलची समस्या वाढत चालली आहे.RBIने ग्राहकांना व्यवहार आणि मार्केटिंग कॉल करण्यासाठी वित्तीय संस्थांसाठी फक्त 2 फोन नंबरची सिरिज सुरू केली आहे

हे सुद्धा वाचा 10वी पास तरुणांसाठी निघाली रेल्वेत मोठी भरती येथे क्लिक करून अर्ज करा
. याचा अर्थ ग्राहकांना रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या या दोन सिरिज नंबरमधूनच बँकिंग कॉल येतील. आरबीआयच्या या निर्णयामुळे मोबाईल युजर्सना फसवणुकीपासून दिलासा मिळणार आहेRBI च्या सूचनेनुसार, बँकांना आता सर्व व्यवहार-संबंधित कॉलसाठी फक्त 1600 ने सुरू होणारे फोन नंबर वापरावे लागतील. जर तुम्ही कोणताही बँकिंग व्यवहार केला असेल आणि त्यासाठी तुम्हाला कॉल आला असेल तर तो फक्त 1600 सिरिजपासून सुरू होणाऱ्या क्रमांकांवरून येईल. अशा स्थितीत, या सिरिजचा क्रमांक हा बँकिंगसाठी आहे हे ग्राहकांच्या लक्षात येईल. यामुळे फसवणुकीसारखी प्रकरणे वाढणार नाहीत असा विश्वास रिझर्व्ह बँकेला आहे.
हे सुद्धा वाचा 10वी पास तरुणांसाठी निघाली रेल्वेत मोठी भरती येथे क्लिक करून अर्ज करा
एसएमएसद्वारे माहितीसाठी, बँकांना फक्त 140 सिरिजपासून सुरू होणारे क्रमांक वापरावे लागतील. बँकिंग मार्केटिंग आणि एसएमएससाठी आरबीआयने हा क्रमांक वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 140 सिरिजपासून सुरू होणाऱ्या क्रमांकांवरून, तुम्हाला पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड किंवा विमा यासारख्या सेवांसाठी कॉल येऊ शकतात.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) वार्षिक अहवालानुसार, 2020 या आर्थिक वर्षात सुमारे 8,703 बँकिंग फसवणुकीच्या घटना झाल्या होत्या. पुढील एका वर्षात 2021 च्या आर्थिक वर्षात 7,338 पर्यंत कमी झाल्या. आर्थिक वर्ष 2022 मध्ये बँकिंग फसवणुकीच्या घटना 9,046 पर्यंत वाढल्या आहेत. तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक 36,073 बँकिंग फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.