RBI ने घेतला मोठा निर्णय या बँकेतील ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा April 10, 2025 by Liveyojana RBI EMI New Repoनमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँकेनं ९ एप्रिल रोजी व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. यानंतर देशातील ४ प्रमुख सरकारी बँकांनीही लेंडिंग रेटमध्ये कपात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना होम आणि कार लोनसह सर्व प्रकारच्या कर्जावर कमी व्याज द्यावं लागणार आहे.तसंच विद्यमान ग्राहकांचाही ईएमआयही कमी होणार आहे. हे सुद्धा वाचा: लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर मिळणार फक्त 550 रुपयाला येथे क्लिक करून बघा सार्वजनिक क्षेत्रातील या चार बँकांनी कर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि युको बँकेनं व्याजदरात कपात केली आहे. बँकांच्या या निर्णयाचा फायदा त्यांच्या विद्यमान आणि नव्या कर्जदारांना होईल.लवकरच इतर बँकांकडूनही अशा घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारीत झालेल्या बैठकीदरम्यान रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करून तो ६.२५ टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करून तो ६ टक्क्यांवर आणण्यात आलाय.रिझर्व्ह बँकेनं (RBI) अल्पमुदतीच्या कर्जाच्या दरात (Repo Rate) कपात केल्यानंतर कर्जाच्या व्याजदरात बदल करण्यात आले आहेत, हे सुद्धा वाचा: लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर मिळणार फक्त 550 रुपयाला येथे क्लिक करून बघा असं या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी शेअर बाजाराला दिलेल्या स्वतंत्र माहितीत म्हटलंय. इंडियन बँकेनं ११ एप्रिलपासून रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट (RBLR) ३५ बेसिस पॉईंटनं कमी करून ८.७० टक्क्यांवर आणला आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) गुरुवारपासून आरबीएलआर ९.१० टक्क्यांवरून ८.८५ टक्क्यांवर आणला आहे.बँक ऑफ इंडियाचा नवा आरबीएलआर ८.८५ टक्के आहे, जो पूर्वी ९.१० टक्के होता. बुधवारपासून नवे दर लागू होतील, असं बँक ऑफ इंडियाने म्हटलंय. युको बँकेने गुरुवारपासून कर्जाचा व्याजदर ८.८ टक्क्यांवर आणलाय. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ९ एप्रिल रोजी रेपो दरात कपात करण्याची घोषणा केली होती. आता रेपो रेट ६ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वेळी फेब्रुवारीच्या धोरणात आरबीआयनं पाच वर्षांत प्रथमच रेपो दरात कपात केली होती.