नागरिकांना मोठा दिलासा.! रेशन कार्ड च्या eKYC साठी झाली मुदतवाढ या तारखेपर्यंत करता येणार eKYC March 4, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. जर लाभार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना शिधा मिळण्यात अडचण येऊ शकतेसुरुवातीला अंतिम मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, येथे क्लिक करून बघा केवायसी कशाप्रकारे करायची मात्र नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता ती 30 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.पूर्वी ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांना जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनद्वारे अंगठा स्कॅन करावा लागत होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे आणि अनेक लाभार्थी बाहेरगावी असल्याने प्रक्रिया वेळेवर पूर्ण करता येत नव्हती. या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” ही दोन मोबाईल अॅप्स सुरू केली आहेत, ज्यामुळे नागरिकांना घरी बसूनच ई-केवायसी करणे शक्य होणार आहे. येथे क्लिक करून बघा केवायसी कशाप्रकारे करायची