मोठी बातमी या लोकांचे रेशन धान्य मिळणे होणार बंद येथे जाणून घ्या कारण

नमस्कार मित्रांनो जिल्ह्यात अंत्योदय व कुटुंब प्राधान्य लाभार्थी सदस्यांचे आधार प्रमाणीकरण २७ लाख ५५ हजार १२५ अर्थात ९९.७९ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणीकरणाची शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली

 

हे सुद्धा वाचा:-  लाडक्या बहिणींसाठी खूशखबर.! या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केले जाते. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यानुसार आधार प्रमाणीकरण व ई-केवायसीसाठी गावोगावी शिबिर घेण्यात आले आहेत.शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी शिबिरात अथवा आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवासी करावयाची आहे. अन्यथा लाभार्थी शिधापत्रिकाधारक सदस्यांना धान्यलाभ दिला जाणार नाही

हे सुद्धा वाचा:-  लाडक्या बहिणींसाठी खूशखबर.! या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट

 

. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना ते अनिवार्य असून, त्यासाठी शिधापत्रिकाधारकांसाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे.कोणत्याही दुकानातून मिळणार रेशन ”वन नेशन वन रेशनकार्ड” अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानात जाऊन अन्नधान्य घेत आहेत. त्या दुकानात ई-केवायसी करुन घ्यावी. लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्तभाव धान्य दुकानात जाऊनही ई-केवायसी करू शकतील, अशी माहिती, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश बिजेवार यांनी दिलीरेशनकार्डाशी आधार लिंकिंग शिल्लक असलेल्या अंत्योदय आणि कुटुंब प्राधान्य शिधापत्रिकाधारक सदस्यांनी नजीकच्या संबंधित स्वस्त धान्य दुकानात जाऊन वेळेत आधार प्रमाणिकरण पूर्ण करून घ्यावे. मुदतीत आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिकेवरील पात्र लाभार्थी सदस्यांना धान्य लाभ मिळू शकणार नाही.

Leave a Comment