नमस्कार मित्रांनो रेशन दुकानदार आणि ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मे महिन्यातील धान्य उचल प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये अन्नधान्य पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले होते.परिणामी, अनेक लाभार्थ्यांना महिन्याच्या सुरुवातीस रेशन मिळाले नाही. त्यामुळे अन्नधान्याच्या टंचाईची भीती निर्माण झाली होती.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मे महिन्यात मिळणार तीन हजार रुपये येथे बघा पात्र महिला
राज्य शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेत, धान्य उचलण्याची अंतिम मुदत 17 मेपर्यंत वाढवली आहे. राज्य सरकारने यापूर्वी निर्देश दिले होते की, पुढील महिन्याचे धान्य वाटपासाठी मागील महिन्याच्या अखेरीस उचलले जावे. यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांवर दबाव होता. तथापि, भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) वेळेवर धान्याचा पुरवठा न झाल्याने एप्रिल 2025 अखेरीस केवळ 6,000 टन धान्य उचलले गेले. पुणे जिल्ह्यासह राज्यात दरमहा सुमारे 14,000 टन धान्याची आवश्यकता असते. यामुळे उर्वरित 8,000 टन धान्य उचलण्यात अडथळे निर्माण झाले आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अनेक रेशन ग्राहकांना धान्य मिळाले नाही.रेशन कार्डधारकांना त्रास होऊ नये यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत.
हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मे महिन्यात मिळणार तीन हजार रुपये येथे बघा पात्र महिला
धान्य उचलण्याची मुदत 17 मेपर्यंत वाढवण्यात आली असून जून 2025 साठी आवश्यक असलेले 14,000 टन धान्य 30 मेपर्यंत उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.असून जून 2025 साठी आवश्यक असलेले 14,000 टन धान्य 30 मेपर्यंत उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यातील सुमारे 50% रेशन दुकानांमध्ये धान्य पोहोचले आहे आणि काही ठिकाणी वितरणाला सुरुवात झाली आहे. यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच धान्य मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित रेशन दुकांनांमध्ये लवकरच धान्य पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांना वेळेत धान्य मिळेल,