पत्नीच्या नावावर घर खरेदी करा आणि लाखो रुपये वाचवा अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन June 1, 2025 by Liveyojana Property Registration Processनमस्कार मित्रांनो महागाईच्या युगात घर घेणं म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं आर्थिक पाऊल. अशा वेळी जर तुम्ही काही शासकीय सवलतींचा योग्य वापर केला, तर घर खरेदी करताना लाखो रुपये वाचवता येतात .यातीलच एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे घराची नोंदणी थेट पत्नीच्या किंवा कोणत्याही महिलाच्या नावावर करणंमहाराष्ट्र सरकारसह अनेक राज्य सरकारांनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सहभागात वाढ करण्यासाठी घर खरेदीवर स्टॅम्प ड्युटीमध्ये विशेष सवलत दिली आहे. येथे क्लिक करून बघा अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन विशेषतः महाराष्ट्रात महिला खरेदीदारांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये 1 टक्का सूट दिली जाते. हे प्रमाण थोडं वाटत असलं, तरी कोट्यवधींच्या व्यवहारात यामुळे लाखो रुपयांची बचत होऊ शकते.घर खरेदी करताना विक्री किमतीच्या एक ठराविक टक्केवारीनुसार स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. महाराष्ट्रात पुरुषांसाठी ही दर सामान्यतः 6 टक्क्यांपर्यंत असते. मात्र, जर घराची नोंदणी महिलांच्या नावावर झाली, तर त्यांच्यासाठी ही दर फक्त 5 टक्के ठेवण्यात आली आहे.उदाहरणार्थ, जर एखादं घर 50 लाख रुपयांचं असेल, तर पुरुष खरेदीदाराला 3 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल (6%). परंतु जर तेच घर महिलेच्या नावावर घेतलं, तर ड्युटी फक्त 2.5 लाख रुपये (5%) लागते. म्हणजेच तुमच्या खिशातून थेट 50,000 रुपयांची बचत! येथे क्लिक करून बघा अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन