राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये होणार जमा यादीत नाव तपासा

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.येत्या 24 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे.

 

तसेच, नमो सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता 1 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे

 

हे सुद्धा वाचा:- राज्य शासनाचा मोठा निर्णय रेशन कार्डवर मिळणाऱ या महिलांना मोफत साडी

. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीच्या योजनांना गती देत आहेत. काही महिन्यांपूर्वीच वाशिम जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM-KISAN योजनेच्या 18 व्या हप्त्याचे आणि नमो सन्मान निधीच्या 5 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा:- राज्य शासनाचा मोठा निर्णय रेशन कार्डवर मिळणाऱ या महिलांना मोफत साडी

 

9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा करण्यात आला होता, तर 91 लाख शेतकऱ्यांना नमो योजनेतून लाभ मिळाला होता.केंद्र सरकारच्या धर्तीवर 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ सुरू केली, जी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत पुरवते.आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते वितरित करण्यात आले असून सहावा हप्ता 1 मार्चपर्यंत जमा होणार आहे.PM-KISAN योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना स्वतःहून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळतो. सध्या राज्यातील 91 लाख शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरले आहेत आणि त्यांनाच नमो योजनेचा सहावा हप्ता मिळेल.PM-KISAN योजनेचा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक असेल.अन्यथा,केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment