उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये होणार जमा यादीत आपले नाव तपासा February 23, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो देशातील ९.८ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान योजनेचा १९वा हप्ता सोमवारी (२४ फेब्रुवारी) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत केला जणार आहे.केंद्र सरकार २२ हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे. पीएम-किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या ३ समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो. येथे क्लिक करून बघा हफ्ता कसा चेक करायचा दरम्यान, तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही? हे कसं चेक करणार?प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचा १८वा हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये देण्यात आला होता. आता या योजनेचा १९वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी जारी केला जाणार आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २०१९ मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसानचा १९ वा हप्ता जारी करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान २४ फेब्रुवारीला भागलपूरमधऊन पीएम-किसानचा १९वा हप्ता जारी करतील. एकूण २२,००० कोटी रुपये थेट ९.८ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातील. येथे क्लिक करून बघा हफ्ता कसा चेक करायचा