निराधार योजनेचे पैसे नागरिकांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात इथे बघा तुमच्या खात्यात पैसे आले का

नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना,

 

सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत 18 हजार 274 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 5 कोटी 96 लाख 65 हजार 900 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी वर्ग होत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी दोन हजार रुपये जमा होणार यादीत नाव बघा

 

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या वरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होण्यास वेळ लागला होता मात्र तरीसुद्धा मागील महिन्यात दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु आता उरलेले सर्वच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.सप्टेंबर,ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण 6280 लाभार्थ्याना 2 कोटी 61 लाख 74 हजार 400 रुपये ,

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी दोन हजार रुपये जमा होणार यादीत नाव बघा

 

ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती 617 लाभार्थ्याना 18 लाख 33 हजार 900 रुपये, ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती 259 लाभार्थ्यांना 7 लाख 71 हजार रुपये, ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्व साधारण 5676 लाभार्थ्यांना 1 कोटी 65 लाख 72 हजार रुपये , ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर 2024 चेश्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 4439 लाभार्थ्यांना 1 कोटी 13 लाख 5 हजार 600 रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आज सायंकाळीपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

Leave a Comment