मोठी बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार हे पाच नवीन नियम तुमच्या खिशावर होणार हे परिणाम January 31, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो फेब्रुवारीपासून नवीन महिना सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याशिवाय नव्या महिन्यात काही नवे बदल होणार आहेत.याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. हे सुद्धा वाचा:- या नागरिकांना सरकार देणार 100 टक्के अनुदानवर मोफत रिक्षा असा करा अर्ज पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. पुढील महिन्यापासून कोणते मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.एलपीजीची किंमत – एलपीजीचे दर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात बदलले जातात. इंधन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती अपडेट करतात. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात होणार की वाढ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिलिंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. कंपन्यांनी १ जानेवारी रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कपात केली होती.युपीआय – युपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियानं काही यूपीआय व्यवहार रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिपत्रकही काढण्यात आलं होतं. हे नवे नियम १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील. १ फेब्रुवारीपासून स्पेशल कॅरेक्टरसह तयार करण्यात आलेल्या आयडीद्वारे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, १ फेब्रुवारीपासून ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स (अक्षरं आणि अंक) वापरले जातील हे सुद्धा वाचा:- या नागरिकांना सरकार देणार 100 टक्के अनुदानवर मोफत रिक्षा असा करा अर्ज . स्वतंत्र ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केल्यास पेमेंट फेल होईल.बँकिंग नियम – कोटक महिंद्रा बँकेनं आपल्या ग्राहकांना आपल्या सामान्य सुविधा आणि शुल्कांमध्ये आगामी बदलांची माहिती दिली आहे. हे बदल १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील. यामध्ये मोफत एटीएम व्यवहाराच्या मर्यादेत सुधारणा आणि विविध बँकिंग सेवांसाठी अपडेटेड शुल्काचा समावेश आहे.