आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी.! नवीन आधार ॲप आले मिळणार आता हे नवीन फायदे April 12, 2025 by Liveyojana New Aadhar Card App :-नमस्कार मित्रांनो आता आधार कार्डचे व्हेरिफिकेशन युपीआय पेमेंटसारखे सोपे होणार आहे. कारण नवा आधारअॅपलाँचझालाअसूनयेथेQRकोडव्हेरिफकेशनचीही सुविधा दिली आ हे.कारण व्हेरिफिकेशनवेळी फेस आयडीसह क्यूआर कोड (QR Code) व्हेरिफिकेशन देखील करता येणार आहे. यामुळे यापूर्वीपेक्षा आताची आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे. हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 1500 रुपये येथे बघा यादीत तर नाव नाही आपले आधार कार्ड सोबत घेऊन जाणे किंवा त्याची झेरॉक्स देण्याची आता गरज भासणार नाही. सरकारने एक नवे आधार मोबाइल अॅप लाँच केले आहे. यासाठी ओळख व्हेरिफिकेशनसाठी केवळ मोबाइलची आवश्यकता आहे. हे अॅप केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लाँच केले आहे.ज्या प्रकारे दुकानात किंवा पेमेंट काउंटर्सवर युपीआय क्यूआर कोड लावलेले असतात त्याप्रमाणे आता पॉइंट्स ऑफ ऑथेंटिकेशनवर आधार व्हेरिफिकेशन क्यूआर कोड दिसणार आहेत हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 1500 रुपये येथे बघा यादीत तर नाव नाही आपले . यामुळे नवे आधार अॅप सुरू करत क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. यानंतर लगेच फेस व्हेरिफिकेशनसह ओखळ पडताळणी देखील होणार आहे. यामध्ये तुमची माहिती थेट मोबाइलच्या माध्यमातून शेअर केली जाणार आहे.नव्या आधार अॅपमध्ये फेस आयडी आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर करण्यात आला आहे. यामुळे ओखळ पडताळणी करणे अधिक सोपे होणार आहे. आता नागरिकाला केवळ क्यूआर कोड स्कॅन करुन किंवा अॅपच्या मदतीने आधार व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. यामध्ये तुमच्या परवानगीनंतरच माहिती शेअर होणार आहे. जेणेकरुन गरिकाच्या खासगी माहितीची सुरक्षितता राखली जाईल.अश्विनी वैष्णव यांनी माहिती देत सांगितले की, अॅप युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियसह मिळून तयार करण्यात आले आहे. यामुळे युपीआय पेमेंटप्रमाणे अॅपमध्ये व्हेरिफिकेशन करणे सोपे होणार आहे.या अॅपच्या मदतीने नागरिकांना हॉटेलमध्ये चेक इन, प्रवास किंवा शॉपिंगवेळी फिजिकल आधार कार्ड दाखवले नाही तरीही चालणार आहे. सध्या हे अॅप बीटा व्हर्जनमध्ये असून टेस्टिंगसाठी उपलब्ध आहे. हे अॅप पूर्णपणे डिजिटल, सुरक्षित आणि युजरच्या नियंत्रणाखाली असणार आहे.