एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! एसटी प्रवासात मिळणार आता 10 ते 15 टक्क्यांची सवलत June 1, 2025 by Liveyojana MSRTC Flexi Fare Yojanaनमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (MSRTC) ‘फ्लेक्सी फेअर’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून एमएसआरटीसी आपल्या प्रवाशांना कमी गर्दीच्या हंगामात आगाऊ तिकीट आरक्षणावर 10 ते 15 टक्के सवलत देणार आहे .ही ‘फ्लेक्सी फेअर’ योजना एसटीच्या वर्धापनदिनी सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या योजनेचा उद्देश प्रवाशांना परवडणारा आणि आकर्षक प्रवासाचा अनुभव देणे आहे. हे सुद्धा वाचा:- आज पासून घरगुती गॅस सिलिंडर झाले स्वस्त पहा ताजे आजचे नवीन दर विशेषतः कमी गर्दीच्या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा फायदा होणार आहे एसटीने संपूर्ण महाराष्ट्रात आपले वाहतूक जाळे विस्तारले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, ग्रामीण महिला आणि इतर सर्वसामान्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून एसटी पार पाडत आहे हे सुद्धा वाचा:- आज पासून घरगुती गॅस सिलिंडर झाले स्वस्त पहा ताजे आजचे नवीन दर . शहरी भागात देखील दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करणारी एसटी बस ही महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ म्हणून ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून एटी बस महाराष्ट्राच्या गावखेड्यांपासून शहरांपर्यंत जोडणारी जीवनरेषा बनली आहे. या नव्या योजनेमुळे प्रवाशांचा एसटीवरील विश्वास आणखी वाढण्यास मदत होणार आहे.कोरोना काळात एसटीच्या प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली होती. प्रवासी संख्या पूर्वपदावर आणण्यासाठी आणि प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळ नवीन योजना राबवत आहे. या प्रयत्नांमुळे प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. नव्या सवलत योजनेमुळे कमी गर्दीच्या हंगामातही प्रवाशांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे एसटीच्या सेवेला अधिक बळ मिळेल.योजना कमी गर्दीच्या हंगामात म्हणजेच जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत लागू असेल. या काळात आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना सर्व आरक्षण असलेल्या बसेसवर 10 ते 15 टक्के सवलत मिळेल. या योजनेमुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात प्रवासाची संधी मिळेल आणि एसटी महामंडळाला प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होईल. ही योजना प्रवाशांसाठी सुविधाजनक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.