अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने झाले स्वस्त, पहा आजचे ताजे नवीन दर April 30, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो देशात आज अक्षय्य तृतीया उत्सव साजरा होत आहे. आजच्या दिवशी ग्राहक सोन्याची देखील खरेदी करतात. कारण ही खरेदी शुभ मानली जाते. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ३० एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २५ कॅरेट सोन्याचा दर ९५,४६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८७,५०५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९७,२५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९७३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात येथे क्लिक करून बघा आजचे दर