लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला हा मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना सुरू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.एकीकडे खात्यात 1500 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहीणी खुश आहेत.

 

हे सुध्दा वाचा:- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडर झाले स्वस्त इथे बघा नवीन दर

तर दुसरीकडे आता या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लाडक्या :-बहिणींना दिल्या जाणाऱ्या या लाभामुळे आता सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याचं दिसत आहे. एकीकडे शिक्षकांचे पगार लाडकी बहीण योजनेमुळे रखडले असल्याचं बोललं जात आहे. तर त्याच अनुषंगाने आता हा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून शासकीय खर्चावर कात्री लावण्यास सुरवात करण्यात आली आहे

हे सुध्दा वाचा:- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडर झाले स्वस्त इथे बघा नवीन दर

 

.नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनातून शासकीय खर्चात 55 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं बघायला मिळत आहे. एकीकडे वित्तीय तुटीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे साधारण 40 हजार कोटी रुपयांची आणखी भर पडणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सरकारने खर्चात कपात केली आहे. राज्य सरकारचा ऊर्जा विभाग, समाजकल्याण विभाग, क्रीडा विभाग आणि इतर विभागातील वाजवी खर्चाला कात्री लावण्याच्या सूचना देण्यात करण्यात आल्या आहे.

Leave a Comment