या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता अजित पवार यांनी केली मोठी घोषणा February 16, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लवकरचं ही रक्कम वाढून 2100 रुपये केली जाणार आहे. लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची ओढ लागली आहे.मात्र हा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या तारखेपासुन खात्यात होणार 2100 जमा यादीत नाव तपासा अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी जालना दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली. ‘लाडक्या बहिणींचा हप्ता पुढच्या आठ दिवसांत खात्यात येईल’, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. म्हणजेच 22 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या तारखेपासुन खात्यात होणार 2100 जमा यादीत नाव तपासा