हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलिंडर असा करा अर्ज
हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलिंडर असा करा अर्ज
जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रातीआधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून कदाचित लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेत नव्याने १२ लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. तसेच महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांनी खोटी माहिती भरुन अर्ज केलेत त्यांना या योजनेत लाभ मिळणार नाही.