लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये झाले जमा तुमच्या खात्यात झाले का तपासा May 3, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेतील या महिन्याची रक्कम अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेली नाही. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पात्र महिलांना एप्रिल महिन्यासाठी १५०० रुपये दिले जातील.परंतु अक्षय्य तृतीयेचा दिवस उलटून गेला आहे. सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर साठी सरकार देणार सव्वातीन लाख रुपये अनुदान अशा प्रकारे करा अर्ज मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत मोठी माहिती दिली आहे.माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा १० वा हप्ता लवकरच २.४१ कोटी महिलांच्या खात्यात येणार आहे. ज्या महिलांना आठवा आणि नववा हप्ता मिळाला नाही त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासह ४५०० रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत, बहुतेक महिलांना मार्चपर्यंत ९ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. उर्वरित महिलांनाही काळजी करण्याची गरज नाही, हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर साठी सरकार देणार सव्वातीन लाख रुपये अनुदान अशा प्रकारे करा अर्ज कारण माझी लाडकी बहीण योजनेच्या १० व्या हप्त्यासह, तुम्हाला मागील हप्ते देखील दिले जातील. याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ट्विट करत मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.