नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाली आहे

महिला व बालविकास विभागाने सकाळपासून ही प्रक्रिया हाती घेतली असून, येत्या दोन दिवसांत किती महिलांना हा हप्ता मिळाला, हे स्पष्ट होईल. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा लाभ घेणाऱ्या 7,74,148 महिलांना 500 रुपये मिळणार आहेत.
हे सुद्धा वाचा: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! शेतकऱ्यांना घरबसल्या काढता येणार फार्मर आयडी येथे जाणून घ्या प्रक्रिया
28 जून आणि 3 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार, इतर शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना 1500 रुपये, तर 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम वितरित केली जाते
हे सुद्धा वाचा: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! शेतकऱ्यांना घरबसल्या काढता येणार फार्मर आयडी येथे जाणून घ्या प्रक्रिया
. आतापर्यंत 9 हप्त्यांद्वारे 13,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून, एप्रिलच्या 1500 रुपयांसह ही रक्कम 15,000 रुपये होईल. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्याही पात्र महिलेला योजनेतून वगळले नसल्याचे स्पष्ट केले. महायुतीच्या निवडणूक विजयात या योजनेचा मोलाचा वाटा होता.