हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा
हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा
. सध्या, २.४७ कोटी महिला योजनेच्या लाभार्थी असल्याचे सांगितले जात आहे या योजनेसाठी १ जानेवारी २०२४ रोजी २१ वर्षे पूर्ण केलेल्या महिला पात्र होत्या. मात्र, अनेक महिलांनी या तारखेनंतर वयाची अट पूर्ण केली आहे किंवा इतर निकषांमुळे त्या नंतर पात्र ठरल्या आहेत.सध्या योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२४ नंतर २१ वर्षे पूर्ण केलेल्या किंवा इतर कारणांमुळे नव्याने पात्र ठरलेल्या महिला अर्ज करू शकत नाहीत. या महिलांना योजनेत कसे समाविष्ट केले जाईल आणि त्यांना लाभ कधीपासून मिळेल, याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली नाही.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘योजनेची अंमलबजावणी कधीपासून करायची, याचा शासन निर्णय (GR) अद्याप प्रलंबित आहे. तो प्राप्त झाल्यावर आणि त्याचा आढावा घेतल्यानंतरच अंमलबजावणीच्या तारखेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.’ त्यामुळे, योजनेसाठी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असली तरी, प्रत्यक्ष लाभ वितरणाला आणि नवीन पात्र महिलांच्या समावेशाला अजून अवधी लागण्याची चिन्हे आहेत.