Maharashtra Weather Updateनमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा फटका बसला. पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.तर, उर्वरित राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा:- स्टेट बँकेची ही योजना करणार तुम्हाला लखपती आजच करा येथे अर्ज
हवामान विभागाने आजसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण तेलंगण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून रायलसीमा, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळं राज्यात ढगाळ आकाश होत असून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली होती. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामनामुळं तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे.
हे सुद्धा वाचा:- स्टेट बँकेची ही योजना करणार तुम्हाला लखपती आजच करा येथे अर्ज
आत जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदूरबार, येथे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रात्रीनंतर आता सकाळी पुन्हा दमदार हजेरी लागली . वादळी वाऱ्यामुळे पालघरच्या ग्रामीण भागातील अनेक घरांच नुकसान झाले आहे . तर भात शेती आणि वीट उत्पादक व्यावसायिकांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे . जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झालाय, तर पूर्व भागात पावसाची रिपरिप सुरू आहे.