Maharashtra Monsoon Updatedनमस्कार मित्रांनो महिन्यात महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. आता जून महिन्यात पुन्हा पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 जून 2025 नंतर राज्यात वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल.मे महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे मोठे नुकसान झाले

हे सुद्धा वाचा:- पती-पत्नीला मिळणार महिन्याला 9 हजार रुपये आजच करा या योजनेला अर्ज
. आता पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी जूनमध्ये पुन्हा जोरदार पावसाची अपेक्षा आहे.मुंबई आणि पुणे येथे सकाळपासूनच अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरातील काही भागात जोरदार पाऊस झाला. येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे आणि उपनगरांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या आहेत.
हे सुद्धा वाचा:- पती-पत्नीला मिळणार महिन्याला 9 हजार रुपये आजच करा या योजनेला अर्ज
राज्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, धुळे आणि जालना या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 13 ते 18 जून 2025 या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाळ्याच्या तयारीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आलेहवामान खात्याच्या अंदाजानुसार, 19 ते 26 जून या आठवड्यात महाराष्ट्रातील विदर्भ विभागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी योग्य वेळ आणि हवामानाचा अंदाज घेऊन पुढील नियोजन करावे, जेणेकरून शेतीच्या कामांना गती मिळेल आणि नुकसान टाळता येईल. 26 जून ते 3 जुलै 2025 या कालावधीत महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील भागांत पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे. या काळात कमी पावसामुळे शेतकऱ्यांनी जलसंधारण आणि पाण्याच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे. हवामानाच्या अचूक निरीक्षणासाठी स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजांचा आधार घ्यावा, ज्यामुळे शेती आणि इतर व्यवस्थापनाचे नियोजन