सर्वसामान्यांना खुशखबर ! LPG सिलेंडर झाला स्वस्त, नवीन दर आजपासून June 1, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक, लहान मोठी रेस्टॉरंट यांना दिलासा मिळाला आहे.महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी गासची किंमत कंपन्यांनी २४ रुपयांनी कमी केली आहे. हे सुद्धा वाचा: सरकारने दिली खुशखबर खाद्यतेल होणार इतक्या रुपयांनी स्वस्त पहा ताजे नवीन दर सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति एलपीजी गॅसच्या किमतीत ८० रुपयांनी कपात झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिन्याच्या १ तारखेपासून २४ रुपयांनी सिलेंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.देशात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १९०० रुपयांपेक्षा जास्त नाहीये. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट करत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही घट करण्यात आलेली नाही हे सुद्धा वाचा: सरकारने दिली खुशखबर खाद्यतेल होणार इतक्या रुपयांनी स्वस्त पहा ताजे नवीन दर . व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्याने जेवण स्वस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाले असतानाच, विमानसाठी लागणाऱ्या एव्हीएशन टर्बाइन फ्यूएलच्या दरात कपात करण्यात आली आहे. याचे दर जवळपास ४.४ टक्क्यांनी कमी झाले आहेत. विमानाचे इंधन स्वस्त झाल्याने त्याचा फायदा प्रवाशांना मिळणार हे पहावे लागणार आहे.