शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! राज्यातील या शेतकऱ्यांना मिळणार जमिनीवर तारण कर्ज

नमस्कार मित्रांनो राज्यातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता बँकाकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यभरातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या जमीनींवर तारण कर्ज मिळणार आहे.Loan For Farmers

 

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपये कर्ज असा करा अर्ज

 

याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा निर्णय कोणत्याही एका बँकेपुरता मर्यादित नसून राज्यातील कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणं सोपे होणार आहे. यापूर्वी 1990 मध्ये भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनींबाबत परिपत्रक काढण्यात आले होते.शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज परतफेड करु शकला नाहीLoan For Farmers

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपये कर्ज असा करा अर्ज

 

. तर बँक अडचणीत येते. अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगावटा वर्ग 2 असेल तरी त्यावर बोजा चढविता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते.त्यामुळे भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत. याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.भोगवटा वर्ग 2 जमीनधारकांना मोठा दिलासासातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी 11 मार्च रोजी भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीबाबत बैठक घेऊन हा प्रश्न महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता.त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ एका बँकेपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील सर्वच भोगवटादार वर्ग 2 खातेधारकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना भोगावटादार वर्ग 2 च्या जमीनी बँकेला तारण घेता येणार आहे.

Leave a Comment