शेतजमीन मोजणी प्रक्रियेत मोठे बदल; आता अशा प्रकारे होणार शेत जमीन मोजणी May 9, 2025 by Liveyojana Land Record Calculationनमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांनो, शेतजमिनीचे वाद (Jamin Mojani) आपल्याला काही नवीन नाहीत. शेती म्हंटल की त्याच्या जागेवरून वाद हे आलेच. बांधाला बांध रेटल्याचा आरोप करत अनेकदा सक्खे शेजारी एकमेकांशी वाद घालत असल्याचे आपण पाहिले असेल. परंतु आता शेतजमिनीचे वाद मिटणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने अलीकडेच जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार मोजणी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. हे सुद्धा वाचा:- सोन्याच्या दरात मोठी घसरण येथे क्लिक करून तुमच्या शहरातील दर बघा त्यामुळे मोजणी प्रक्रिया अतिशय सोप्पी आणि पारदर्शक होणार आहे. जमीन मोजणी प्रक्रियेत नेमका कोणता बदल करण्यात आलाय ते आपण सविस्तर पाहुयात.भूमी अभिलेख विभागाने शेतजमिनीच्या मोजणी प्रक्रियेत (Jamin Mojani) सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी एकाच सर्वे क्रमांकातील पोटहिश्शांची मोजणी करताना एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, आता शेजारील जमिनीच्या मालकांना नोटीस पाठवण्याचे काम थेट स्पीड पोस्टद्वारे केले जाईल आणि त्या नोटीशीची पोहोच झाल्याशिवाय प्रत्यक्ष मोजणी सुरूच करता येणार नाही. तसेच मोजणी होणाऱ्या जमिनीवर पूर्वसूचना फलक लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. या फलकाचा फोटो तारीख व वेळेसह GIS पोर्टलवर अपलोड केले जाणार आहे.ज्यामुळे मोजणीचे पुरावे कायम स्वरूपात नोंदवले जातील. भूमी अभिलेख विभागाच्या या नियमामुळे गैरसमज, फसवणूक किंवा जबरदस्ती टाळता येईल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल. हे सुद्धा वाचा:- सोन्याच्या दरात मोठी घसरण येथे क्लिक करून तुमच्या शहरातील दर बघा