सरकारचा मोठा निर्णय.! 1-2 गुंठे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार December 27, 2024 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. आता एक-दोन गुंठ्यांची खरेदी विक्री करता येणार आहे. अशा व्यवहारांसाठी प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. यासाठी सरकारला शुल्क म्हणून पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या पाच टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.मात्र अशा खरेदी विक्रीची परवानगी फक्त काहीच प्रकरणांसाठी देण्यात येत आहे. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा होणार 9 हजार रुपये याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.तुकडेबंदी कायद्यामुळे खरेदी विक्रीस अडचणतुकडेबंदी कायदा 1947 साली लागू करण्यात आला होता. या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आहे होते. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी किंवा विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे कमी क्षेत्राची खरेदी-विक्री करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा पैसे देऊनही व्यवहार अडकून पडत होते. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा होणार 9 हजार रुपये नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तुकडेबंदी कायद्यात 2017 साली सुधारणा करण्यात आली होती. यानुसार 1965 ते 2017 या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25 टक्के रक्कम शासनाला देण्याची अट घालण्यात आली होती. मात्र ही रक्कम अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे याचा फारसा फरक पडला नाही. मात्र आता सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी- विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी 25 टक्के शुल्काऐवजी 5 टक्के शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.कायद्यातील सुधारणेनुसार पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क भरून व्यवहार करता येणार आहेत. मात्र यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. फक्त विहीर, घर बांधकाम व रस्त्यासाठीच 1 ते 5 गुंठ्यांचे व्यवहार करता येणार आहेत. याशिवाय इतर कामांसाठी खरेदी विक्रीला परवानगी नाकारली जाणार आहे.