महिला शेतकऱ्यांसाठी भूसंपादन विभागाचा मोठा निर्णय!’ या’ लाभार्थींना पैसे घरपोच मिळणार

नमस्कार मित्रांनो सोलापूर ते तुळजापूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या महिला शेतकऱ्यांना थेट घरपोच मोबदला देण्याचा अभिनव उपक्रम भूसंपादन विभागाने सुरू केला आहे.

 

महिला दिनाचे औचित्य साधून उपजिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी अमोल भोसले यांनी संबंधित महिलांच्या घरी जाऊन त्यांचे कागदपत्र पूर्ण करून घेतलेतसेच बँकांशी समन्वय साधत खात्यांशी संबंधित तांत्रिक त्रुटी दूर करण्याची कार्यवाही केली

 

 

हे सुद्धा वाचा:- महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे झाले जमा येथे बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

.सोलापूर शहर आणि परिसरातील 10 गावांतील 15 महिला शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला देण्यात येणार आहे. एकूण 6 कोटी 15 लाख रुपयांचे धनादेश वितरित केले जाणार आहेत.राज्य शासनाने 100 दिवसांचा विशेष आराखडा जाहीर करत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले होते.

हे सुद्धा वाचा:- महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे झाले जमा येथे बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

 

याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील गावांतील महिला शेतकऱ्यांना केवळ 30 दिवसांत मोबदला मिळणार आहे.भूसंपादनाची प्रक्रिया अनेकदा गुंतागुंतीची असते. विशेषतः महिला शेतकऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याबाबत तांत्रिक माहिती कमी असते. काही लाभार्थी महिला सध्या परगावी असल्याने त्यांचा प्रस्ताव प्रक्रियेत अडथळे येत होते. त्यामुळे प्रशासनाने थेट महिलांशी संपर्क साधून ही प्रक्रिया सुलभ केली.

 

Leave a Comment