नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील डिसेंबर महिन्याचा हप्ता बुधवारीलाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत उर्वरित लाभार्थींना पैसे मिळतील, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.मात्र, ज्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा नवीन लाभार्थींसाठी योजनेची नोंदणी सध्या बंद करण्यात आली आहे.
हे सुध्दा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार या योजनेअंतर्गत 15 हजार रुपये असा करा अर्ज
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की शासनाकडून आदेश मिळाल्यानंतरच नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल. सोलापूर जिल्ह्यात सुमारे साडेदहा लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु यंदा यादीतील अनेक नावे वगळली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.संजय गांधी निराधार योजनांशी लिंक केलेले लाभार्थी वगळले जाणारराज्य शासनाने योजनेत दुबार लाभ घेणाऱ्या लाभार्थींना ओळखून यादीतून त्यांची नावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाईल
हे सुध्दा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार या योजनेअंतर्गत 15 हजार रुपये असा करा अर्ज
. शासनाकडे या योजनांची अद्ययावत यादी असल्याने, डिसेंबरचा हप्ता संबंधित महिलांच्या खात्यात जमा होणार नाही.द रम्यान, अनेक महिलांनी योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडे नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे, मात्र शासनाच्या आदेशाशिवाय पुढील प्रक्रिया होणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.योजनेतील पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्नराज्य शासनाने योजनेंतर्गत लाभार्थींच्या यादीतील दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे योजना अधिक पारदर्शक होईल आणि गरजू महिलांपर्यंत तिचा लाभ पोहोचेल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजना सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. मात्र, नवीन नोंदणी थांबवल्यामुळे काही महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. शासनाकडून पुढील आदेश मिळाल्यानंतरच प्रक्रिया पुढे जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.