लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आली होती. या योजनेचा फायदा घेत महायुती सरकारने दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 रुपये झाले जमा इथे बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

मात्र आतापर्यंत लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळत नसल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात 2100 रुपयांबाबत घोषणा होणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र या अर्थसंकल्पात देखील याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने आता विरोधकांनी या प्रकरणात राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.यावर उत्तर देत मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक महत्वकांक्षी योजना आहे

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 रुपये झाले जमा इथे बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

 

, ती महायुतीच्या सरकारनं आणली आहे. माहिलांना 1500 रुपयांचा लाभ वितरीत करणारं हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात जो आंनद आहे, तो कायम राहणार आहे. 2100 रुपयांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार योग्यवेळी निर्णय घेतील. अशी माहिती विधानसभेत आदिती तटकरे यांनी दिली.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा