या लाडक्या बहिणींना मिळणार नाही जून महिन्याचे 1500 रुपये येथे बघा तुम्हाला मिळतील का June 11, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येत असतात.महायुती सरकारने सुरू केलीली ही योजना खूपच लोकप्रिय ठरली. इतकेच नाही तर ही योजना विधानसभा निवडणूक 2024 मध्ये गेमचेंजर ठरली आणि महायुतीचा महाविजय झाल्याचं बोललं जात आहे.लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळाला. आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या या हप्त्याला गेल्या काही दिवसांपासून उशीर होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला. त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.लाडकी बहीण योनजेच्या जून महिन्याच्या हप्तासंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सधारणत: प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या नंतर बँकेत जमा करण्यात येत असतो. अशाच प्रकारे आता जून महिन्याचा हप्ता सुद्धा 20 तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये किंवा तशी घोषणाही करण्यात आलेली नाहीये. येथे क्लिक करून बघा या लाडक्या बहिणींना मिळणार नाही पैसे