या लाडक्या बहिणींवर कारवाई होणार, तुमचंही नाव आहे का? यादीत नाव तपासा

नमस्कार मित्रांनो बहीण योजनेबाबत रोज नवीन अपडेट समोर येत असतात.नुकतीच काही सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. जवळपास अडीच हजार महिला सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.त्यांनी निकषाबाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

हे सुद्धा वाचा:-  पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळणार महिन्याला 20 हजार रुपये अशा प्रकारे करा अर्ज

त्यांच्याकडून वसुली करायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांनी असं करायला नको होते. दीड हजार रुपये महिन्याकरिता सरकारी सेवेत असलेल्या नोकरदारांनी, बहिणींनी असे करायला नको. मिळालेला लाभ परत करायला पाहिजे. शासन वसुली करेलच. काही खात्यांनी चौकशी सुरू केली आहे. काही खात्यांनी वसुली सुरू केली आहे. मात्र कुठल्याही योजनेचा फायदा सरकारी कर्मचारी किंवा जे सक्षम आहेत त्यांनी घेऊ नये, घेतला असेल तर त्यावर कारवाई नक्की होईल

हे सुद्धा वाचा:-  पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळणार महिन्याला 20 हजार रुपये अशा प्रकारे करा अर्ज

 

 

, असं त्यांनी म्हटलं आहे.सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेच्या नियमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असं लिहलं आहे. तरीही त्यांनी अर्ज केले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्यांचे अर्ज स्विकारले गेले. या अर्जांची एकदा पडताळणीदेखील झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा पुन्हा पडताळणी झाली तेव्हा या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे इतर अजूनही अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतला असल्याची शक्यता आहे.

Leave a Comment