लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! 26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये होणार जमा येथे यादी तपासा January 18, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी ( दि.16) मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली हे सुद्धा वाचा:- आधार कार्ड वर मिळणार आता तुम्हाला दोन लाख रुपये कर्ज अशा प्रकारे करा अर्ज .महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे. हे सुद्धा वाचा:- आधार कार्ड वर मिळणार आता तुम्हाला दोन लाख रुपये कर्ज अशा प्रकारे करा अर्ज मंत्री तटकरे यांनी याबदल आपल्या ट्विटर खात्यावरूनही याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ! योजनेतील सर्व पात्र महिलांना २६ जानेवारी २०२५ पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ३६९० कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे.”