लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाडक्या बहिण योजनेचा अर्ज कसा घ्यायचा मागे येथे जाणून घ्या प्रकिया

नमस्कार मित्रांनो निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतरही राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष निवडणुकीनंतर बदलल्याची ओरड विरोधकांकडून सातत्याने होते आहे.

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार 1500 रुपये या दिवशी जमा येथे बघा यादीत नाव

 

आता याचे निकष बदलो अथवा न बदलो तरीही पडताळणीनंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांनी स्वतःहूनच अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे.महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनीच यासंदर्भात माहिती दिलीतुम्हालाही जर अर्ज मागे घ्यायचा असेल तर काय करायचे आहे, तुम्हाला माहीत आहे का. आम्ही त्याचीच माहिती देणार आहोत.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार 1500 रुपये या दिवशी जमा येथे बघा यादीत नाव

 

 

या योजनेचे संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यात 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच ज्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही पण यासाठी अर्ज केला आहे, त्याची देखील पडताळणी केली जाणार आहे.ज्या महिलांना याचा लाभ घ्यायचा नाही, त्या तालुका तसेच जिल्हा स्तरीय महिला आणि बालकल्याण अधिकारी, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात लेखी अर्ज करू शकतात. ज्या बहिणींनी या योजनेच्या निकषांनुसार पात्र न झाल्याने अर्ज रद्द करण्यास सांगितलाआहे,त्यानीhttps://ladakibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जात तक्रार निवारणाचा पर्याय निवडायचा आहे. यात त्या या योजनेसाठी पात्र नाहीत, असे सांगत ऑनलाइन तक्रार करायची आहे.या योजनेसाठी ज्यांनी चुकीचा अर्ज भरला आहे, त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. पुढचा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे. मात्र, तोवर लाभार्थ्यांची संख्या आधीपेक्षा कमी असेल.राज्यभरातून अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी आपल्याला पैसे नको असल्याचे सांगितले आहे. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्याच्या भीतीने लाडक्या बहिणींनी अर्ज माघार घ्यायला सुरुवात केली आहे. या महिलांना दंड आकारण्याचा कोणताही विचार नसला तरी त्यांनी मिळवलेली रक्कम थेट हस्तांतर योजनेशी सलंग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरातील अनेक महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.

Leave a Comment