मोठी बातमी लाडकी बहीण योजनेत होणार बदल या महिला होणार आता अपात्र यादीत आपले नाव बघा February 17, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Maharashtra Ladki Bahin Yojana) अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. परंतु आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहे. हे सुद्धा वाचा:- स्टेट बँकेच्या या योजनेत मिळणार दर महिन्याला 90 हजार रुपये असा करा अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा घोषणांमुळे दोन लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट, पुरेशा निधीचा अभाव यामुळे सरकारला आखडता हात घ्यावा लागत आहे.याचदरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.लाडकी बहीण योजनेत काही बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याचं सांगण्यात येत आहे.दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानूसार, दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही अट असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे हे सुद्धा वाचा:- स्टेट बँकेच्या या योजनेत मिळणार दर महिन्याला 90 हजार रुपये असा करा अर्ज . त्यामुळे राज्य सरकार लाभार्थींच्या उत्पन्नाबाबत प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहेप्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.अन्य मार्गांनीही एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहेशासनाच्या स्क्रुटीनीनुसार आत्तापर्यंत 5 लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये 2 लाख 30 हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत.