मोठी खूशखबर.! तुमच्या मुलीचे लग्न करण्यासाठी सरकार देणार इतके रुपये अनुदान असा करा लवकर अर्ज

नमस्कार मित्रांनो लग्नसमारंभावर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी मागासवर्गीयांचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. यामुळे संबंधित कुटुंबांच्या खर्चाची बचत होते.विवाह समारंभ पार पाडणे म्हणजे मोठी आर्थिक तजवीज करावी लागते. प्रत्येक पालक आपल्या ऐपतीनुसार पैसा खर्च करतो.

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

अनेकदा गरीब कुटुंबातील पालकांना आपल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी दुसऱ्यापुढे मदतीसाठी हात पसरावे लागते किंवा त्यांना दुसऱ्याकडून कर्ज काढावे लागते. कर्ज देणारेही त्याच्या ऐपतीचा विचार करून कर्ज नाकारतात. अशा वेळी काय करावे, असा प्रश्न त्या पालकांसमोर असतो. गत अनेक वर्षापासून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने कन्यादान योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केल्यास जेवणावळीसह मंडपाचाही खर्च बचत होतो. शिवाय, संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी शासनाकडून अनुदान प्रत्येक दाम्पत्याला दिले जाते. याशिवाय, संस्थांनाही शासकीय मदत मिळते

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment