तुमच्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे दोन मिनिटात तपासा अशा प्रकारे मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे (Government Scheme) पैसे अनेकदा बँक खात्यात जमा होण्यास अडचणी येतात. कारण आता आधार नंबर (Aadhar Number) महत्वाचा मानला जातो.

 

त्या व्यक्तीचा आधार नंबर ज्या बँकेला लिंक असेल त्या बँक खात्यात पैसे जमा होतात.
पण अनेकदा काही शेतकऱ्यांचे आधार बँकेला लिंक (bank Link Aadhar) नसते किंवा कुठल्या बँकेला आधार लिंक आहे, हे लक्षात येत नसते. त्यामुळे आजच्या लेखातून तुमच्या आधार नंबरला नेमकी कोणती बँक लिंक आहे?

 

हे सुद्धा वाचा:- नवीन वर्षात लाडक्या बहिणींना मिळणार मोठे गिफ्ट खात्यात होणार 2100 रुपये जमा

हे तपासुयात
अशी आहे संपूर्ण प्रक्रियासर्वप्रथम गुगलवरजाऊन https://www.npci.org.in/ या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.यानंतर आपल्यासमोर सहा पर्याय दिसतील यातील Consumer पर्यायावर क्लिक करा.Consumer वर क्लिक केल्यानंतर पुन्हा अनेक पर्याय दिसतील.यातील शेवटचा पर्याय असलेल्या Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) या पर्यायावर क्लिक करा.या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.या नवीन इंटरफेसवर डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये ज्या रेषा आहे, त्यावर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा:- नवीन वर्षात लाडक्या बहिणींना मिळणार मोठे गिफ्ट खात्यात होणार 2100 रुपये जमा

इथे क्लिक केल्यानंतर काही पर्याय दिसतील, यामध्ये तुम्हाला Aadhaar Mapped Status जो चार नंबरचा पर्याय आहे, तो निवडायचा आहे.
यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या तिन्ही बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे.
आधार नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आहे.त्यानंतर खाली दिलेल्या चेक स्टेटस पर्यायावर क्लिक करायचं आहे.तसेच आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावर आलेला ओटीपी ते टाकायचा. खाली सबमिट बटणावर क्लिक करायचा आहे.यानंतर आपल्यासमोर संपूर्ण माहिती दिसेल. यात आधार नंबर, मॅपिंग स्टेटस दिसत आहेत. तर सर्वात शेवटी बँकेची माहिती दिसेल.जर आपणास बँकेचे काही अपडेट दिसत नसतील तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडा.
तुम्हाला एक कार्ड दिल जाईल आणि त्यानंतर तुमचा अकाउंट आधार नंबरशी लिंक होईल.

Leave a Comment