.सोन्याच्या वाटलाच विक्रमी दराकडे चालली आहे. पण आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण, सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला आता ब्रेक लागला आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.बुधवारी (26 फेब्रुवारी 2025) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2,700 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8,80,900 रुपयांवरुन 8,78,200 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 88,090 रुपयांवरुन 87,820 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 2500 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 8,07,500 रुपयांवरुन 8,05,000 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 80,750 रुपयांवरुन 80,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.18 कॅरेट सोन्याच्या दरात 2000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर 6,60,700 रुपयांवरुन 6,58,700 रुपये इतका झाला आहे. तर 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 66,070 रुपयांवरुन 65,870 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.