गुढीपाडव्या पूर्वी सोन्याच्या दरात झाली मोठी वाढ पहा लगेच ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो गुढीपाडवा उद्या साजरा करण्यात येत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकजण खरेदीसाठी घराबाहेर पडतात

.

त्यामुळं पाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेऊयात.गेल्या काही काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय.

 

हे सुद्धा वाचा:- कर्मचाऱ्यांच्या खात्यात ३ हजार रुपये झाले जमा येथे तपासा तुमच्या खात्यात आले का पैसे

शनिवारी 29 मार्च 2025 रोजी पुन्हा एकदा सोनं महागलं आहे. सोन्याचे दर काय आहेत जाणून घेऊयात.आज देशात 24 कॅरेट सोन्याचे दर 90,000 रुपये प्रतितोळा आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 82 हजार रुपये प्रतितोळा असणार आहे. 28 मार्चच्या तुलनेत आज मौल्यवान धातुच्या किंमती 1200 रुपयांनी वधारल्या आहेत. ऐन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना काहीसा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळतेय.देशातील सर्व शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 90 हजार रुपयांच्या पार पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 82 हजार रुपयांवर स्थिर आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही आज वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. भारतात एक किलो चांदीचे दर 1,05,000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. भारतात 1 किलो चांदीची किंमत 15 ग्रॅम सोन्याच्या बरोबर मानली जाते.मुंबईत 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याची किंमत 89,840 रुपये आहेत. हाच दर जीएसटीसह 90 ते 91 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 82,350 रुपये आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती.

हे सुद्धा वाचा:- कर्मचाऱ्यांच्या खात्यात ३ हजार रुपये झाले जमा येथे तपासा तुमच्या खात्यात आले का पैसे

 

त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याचे दरांनी उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात सातत्याने होत जाणारी वाढ यामुळं गेल्या तीन महिन्यात MCX वर 16 टक्क्यांची उच्चांकी वाढ झाली आगे. सोनं हा सुरक्षित गुंतवणुकीचा योग्य पर्याय असल्याने सोन्याची मागणी वाढत आहे आणि त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत मौल्यवान धातुच्या किंमती एक लाखांपर्यंत जाणार का, असा सवालही उपस्थित होताना दिसतोय.

Leave a Comment