सोन्याचा भाव कोसळला सोनं खरेदीसाठी प्रचंड गर्दी पहा लगेच ताजे दर

नमस्कार मित्रांनो सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. सोन्याचा दर त्याच्या विक्रमी उच्चांकावरून प्रति 10 ग्रॅम 6658 रुपयांनी घसरला आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेले टॅरिफ वॉर निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देश कधीही एकमेकांशी समझौता करू शकतात, असे संकेत मिळत आहेत.

 

हे सुध्दा वाचा:-  लाडक्या बहिणींना मिळणार बिनव्याजी 5 लाख रुपये कर्ज अशाप्रकारे करा अर्ज

त्यामुळे जागतिक बाजारापासून ते सराफा बाजार आणि एमसीएक्सपर्यंत सोन्याचे भाव दररोज कमी होत आहेत. वायदे बाजारात (एमसीएक्स) शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92,700 रुपये होती. ती 99,358 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकापेक्षा 6658 रुपये कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 3240.88 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, कॉमेक्स गोल्ड प्रति औंस 3257 रुपयांवर बंद झाला.अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या थंडावण्यामुळे सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिका चीनवरील शुल्क कमी करू शकते. या संकेतानंतर डॉलर मजबूत होत आहे आणि सोन्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र, तरीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 92000 ते 94500 रुपयांच्या दरम्यान असू शकते. तसेच जागतिक परिस्थितीनुसार सोन्याच्या दरता चढउतार कायम राहू शकतात,

हे सुध्दा वाचा:-  लाडक्या बहिणींना मिळणार बिनव्याजी 5 लाख रुपये कर्ज अशाप्रकारे करा अर्ज

 

असे तज्ज्ञांनी सांगितले.सोन्याने 1 लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यानंतर आता सोन्याच्या किमतीत दररोज घसरण होत आहे. सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 92650 रुपये आहे. तर मुंबईत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 92,810 रुपये आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 93954 रुपये आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86062 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 70466 रुपये आहे. 14 कॅरेट सोन्याची किंमत 54963 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 1 किलो चांदीची किंमत 94125 रुपये आहे.

Leave a Comment