इथे क्लिक करून बघा कोणाकोणाला मिळणार मोफत सिलेंडर
स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे.
या योजनेत राज्यातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी दिली जाते. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार २३९ लाभार्थी कुटुंबांना वार्षिक तीन सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.