शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १० तास मोफत वीज

Free Electricity For Farmerनमस्कार मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आर्वी येथे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज (Electricity) देण्याची घोषणा केली.तसेच, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे.

 

हे सुद्धा वाचा:- मुलींच्या खात्यात होणार 10 हजार रुपये जमा येथे क्लिक करून अर्ज करा 

महाराष्ट्र देशात पाहिलं राज्य ठरलं आहे, की ज्या राज्याने विजेचे बिल दर 5 वर्षांनी कमी करून दाखवले, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. दरम्यान, या ठिकाणी आमदार-खासदारांनी ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या आहे, त्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मी पण वर्धा जिल्ह्याचा काही काळासाठी पालकमंत्री होतो, त्यामुळे इथे विशेष लक्ष आहे, असेही त्यांनी म्हटले.शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देऊ अशी घोषणा केली होती, 80 टक्के महाराष्टात आता लवकरच दिवसा 10 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल.

हे सुद्धा वाचा:- मुलींच्या खात्यात होणार 10 हजार रुपये जमा येथे क्लिक करून अर्ज करा 

 

विहीर पुनर्भरण ही योजना जर हातात घेतली तर त्याचा फायदा होईल, विहिरींची पातळी वाढेल, आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपलाही प्रदेश रेगिस्थान झाल्याशिवाय राहणार नाही, असा संभाव्य धोकाही फडणवीसांनी बोलून दाखवला.प्रत्येक घरांवर सोलर लागेलप्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्येकाला घर देण्यासाठी पाऊल उचलले आहे. घराकरिता 2 लाख रुपये मिळतील हा निर्णय आपण केला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लागेल. त्यामुळे, नागरिकांना मोफत वीज मिळेल, असेही फडणवीसांनी म्हटले.

Leave a Comment