Free Adhar Update Processनमस्कार मित्रांनो आधारकार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक ओळखपत्र आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेत खातं उघडण्यासाठी, मुलांच्या शाळा-कॉलेज प्रवेशासाठी किंवा मोबाईल सिमसाठी आधार आवश्यक असतो.

मात्र, अनेक नागरिकांच्या आधार कार्डातील माहिती अद्ययावत नसते, ज्यामुळे त्यांना शासकीय सेवांचा लाभ घेताना अडथळे येतात
येथे क्लिक करून बघा मोफत अपडेटची कसे करावे
. हीच अडचण दूर करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. मात्र, ही सुविधा 14 जून 2025 पर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर या अपडेटसाठी शुल्क आकारलं जाणार आहे.आजही अनेक नागरिकांच्या आधारमध्ये चुकीचं नाव, जुना पत्ता, चुकीची जन्मतारीख किंवा बदललेला मोबाइल नंबर आहे. ही माहिती चुकीची असल्यास आधार पडताळणी फेल होते, आणि बँक व्यवहार, सरकारी सबसिडी, शिष्यवृत्ती, पेन्शन यासारख्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होतो. यासाठी आधार वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं ठरतं.UIDAI ने सांगितलं आहे की 14 जून 2025 पर्यंत नागरिकांना ऑनलाइन मोफत माहिती अपडेट करण्याची मुभा दिली आहे. यामध्ये नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख (फक्त एकदाच), आणि मोबाइल क्रमांक यांचा समावेश आहे. मात्र, बायोमेट्रिक अपडेटसाठी (बोटांचे ठसे, डोळ्यांचा स्कॅन, फोटो) आधार केंद्रावर प्रत्यक्ष जावं लागेल आणि त्यासाठी शुल्क द्यावं लागेल.
येथे क्लिक करून बघा मोफत अपडेटची कसे करावे