सर्वसामान्यांना मोठा झटका खाद्यतेलाच्या दरात 20 ते 25 रुपयांची झाली मोठी वाढ इथे बघा ताजे दर January 6, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांची जेवणाची फोडणी अधिक महागली आहे.त्याचबरोबर हॉटेल व रस्त्यावर मिळणारा वडापाव, भजी, डोसे आदी पदार्थही महागण्याची शक्यता आहे हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी होणार 2 हजार रुपये जमा येथे बघा यादीत नाव .देशातील नागरिक सर्वसाधारणपणे सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल व पामतेलाचे सेवन करतात. या सर्वांचे पिकाचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. त्यात केंद्र व राज्य सरकारने सोयाबीनसह सर्व पिकांच्या हमीभावात वाढ केली. सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून केंद्र सरकारने खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात ३० टक्के वाढ झाली. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात खाद्यतेलाचे दर वाढले. तेलाच्या एका लिटरमागे २० ते २५ रुपये वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलेदोन वर्षांपूर्वी देशात खाद्यतेलाचे दर वाढले होते. त्यावेळी सरकारने इतर देशातून पामतेल आणि इतर तेल आयात करण्याचे धोरण आखले. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी होणार 2 हजार रुपये जमा येथे बघा यादीत नाव त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. आता केंद्र सरकारने सोयाबीनचा दर वाढवला आहे. तसेच तेलावर २० टक्के आयात शुल्क आकारायला सुरुवात केले. वाशीतील एपीएमसी बाजारात दरमहा ७ ते ८ टन तेलाची आयात होते..पूर्वी एक लिटर सूर्यफूल तेल १२० रुपयांना मिळत होते. ते आता १४० रुपयांना मिळत आहे. पामतेलाचा भाव १०० रुपयांवरून १४० रुपये प्रति लिटर झाला. तसेच सोयाबीन तेल ११५-१२० वरून १३० ते १३५ रुपयांवर पोहोचले आहेत.